◾लोकाधीकार/शब्बीर पठाण
जालना दि.१२
कोरोना महामारी च्या अनुषंगाने सध्या जालना शहरांमध्ये दहा दिवसीय संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सर्व आस्थापने, दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असताना काही दुकान मालक मात्र आपली दुकाने चालू ठेवून विक्री करीत असलेले आढळून येत आहे.
जुना जालना भागातील टाऊन हॉल येथील एक पतंगाचे दुकान ऊघडे असल्याबाबत ऊपविभागीय पोलीस अधीकारी सुधीर खिरडकर यांना खबर मिळाली. संचारबंदीच्या काळात दुकान ऊघडे ठेवून दुकानांमधून पतंग आणि मांजा ची विक्री होत आहे, त्या अनुषंगाने सदरील दुकानावर कदीम जालना पोलिसांनी छापा टाकला असता दुकानातून पतंग आणि मांजा जप्त करण्यात आला आहे.
सदरील मांजावर बंदी असताना दुकान मालक राजरोसपणे विक्री करत असल्याबाबत आढळून आले आहे. दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची पुष्टी कदीम जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी केली आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी श्री सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कदीम जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन, जमादार कैलास जावळे व सरोदे मॅडम यांच्या पथकाने कारवाई केली.