▪लोकाधीकार/शब्बीर पठाण
चंदनझिरा परिसरात शहिद भगतसिंह शाळेत मा. राज्यमंत्री नामदार बच्चू भाऊ कडू यांच्या जन्मदिना निम्मित आज दिनांक 5/07/2020 रोजी वृक्षारोपण करण्यात आले. प्रहार संगठना च्या जिल्हा अध्यक्ष विठ्ठल चव्हाण आणी जालना शहर अध्यक्ष शेख जावेद, दैनिक जंग चे पत्रकार अर्शद मिर्झा यांच्या वतीने या वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आपल्या अभिनव आंदोलनासाठी बच्चू कडू महाराष्ट्रात विशेष प्रसिद्ध आहेत. मा.बच्चू कडू यांना "अपंगाचे मसीहा" म्हणून ओळखले जाते. अपंग बांधवांसाठी च्या सरकारी योजनांची अंमलबजावणी व्हावी म्हणून त्यांनी वेळोवेळी विधिमंडळात आवाज उठवला व आंदोलने केली. अपंग बांधवांना विधानपरिषदेवर प्रतिनिधित्व देण्याबाबत बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे. समाजकारणाला प्राधान्य देऊन राजकारण करता येते, याशिवाय धर्म, जात, पक्ष यापलीकडे जाऊन सुद्धा सामान्य जनतेचे कामे व्हावी अशी बच्चू भाऊंची नेहमीच अपेक्षा असते.
बच्चु भाऊंच्या वाढदिवसा निमित्ताचे औचित्य साधून चंदनझीरा परिसरात वृक्षारोपण करण्याचा संकल्प शहराध्यक्ष शेख जावेद यांनी केला.
यावेळी शहिद भगत सिंह शाळेचे मुख्याध्यापक दत्ता खरतूड़े, बागल सर, प्रहार अपंग संघटना चे जिल्हा अध्यक्ष चव्हाण, जालना शहरअध्यक्ष शेख जावेद, शेख अनवर, शेख अजहर, शेख वाजेद, लल्ला अंभोरे ई. पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.