भाजपाच्या प्रदेश कार्यसमितीवर बद्रीनाथ पठाडे यांची निवड


जालना (प्रतिनिधी)


 भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यसमितीच्या सदस्यपदी बद्रीनाथ मारोती पठाडे यांची नियुक्ती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी केली आहे.
केंद्रीय राज्यमंत्री ना. रावसाहेब पाटील दानवे व माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर, जिल्हाध्यक्ष आ. संतोष पाटील दानवे, आ. नारायण कुचे यांच्या शिफारसीवरून सदर निवड करण्यात आली असून बद्रीनाथ पठाडे हे भाजपाचे गेल्या तीस वर्षापासून भाजपाचे एकनिष्ठ कार्यकर्ते असून त्यांनी भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष, जि. प. सदस्य व जिल्हा परिषद उपाध्यक्ष, भाजपा जिल्हा सरचिटणीस आदी पदे भुषविली असून त्यांच्या कार्याची दखल घेवून केंद्रीय राज्यमंत्री ना. रावसाहेब पाटील दानवे यांनी भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यसमितीवर सदस्य म्हणून निवड करण्यासाठी शिफारस केली होती. श्री पठाडे यांच्या निवडीबद्दल भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


Popular posts
काऱ्हाळा विज केंद्राच्या ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड कोट्यावधीच्या खर्चातून निर्माण झालेले 33 केव्ही काही महिन्यातच नादुरुस्त!   विजपुरावठा सुरळीत होत नसल्याने ग्रामस्थांतून तिव्र संताप!
Image
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तात्पुरते निवृत्तिवेतन मिळणार सेवा पुस्तिका पडताळणीस विलंब होत असल्याकारणाने शासनाचा निर्णय
Image
अत्याधुनिक कोरोना टेस्टिंग लॅबचं लवकरच लोकार्पण - राजेश टोपे आता अहवाल येण्यास विलंब होणार नाही
Image
अंगणवाडी सेविका आरोग्यकर्मचारी यांच्या मार्फत हकीम मोहल्ला,टटूपुरा,या ठिकाणी सर्वेक्षण करण्यात येत आहे
Image