सोयाबीन प्रकरणी गुन्हे दाखल होत असल्याने आष्टीत कृषी सेवा केंद्र चालकांचा बंद दोष कंपन्यांचा ताप मात्र विक्रेत्यांना  सोयाबीन उगवत नसल्याने शेतकऱ्यांच्या तक्रारी 



मारोती जवळकर
 आष्टी/परतुर 
महाराष्ट्रभर सध्या सोयाबीन उगवत नसल्याच्या तक्रारी वाढल्या असुन या वर्षी शेतकऱ्यांनी पेरलेल्या सोयाबीन उगवल्या नसल्याने सर्वस्तरातून ओरड झाल्याने संबंधित विभागाच्या वतीने कार्यवाही करीत अनेक विक्रेत्यावर गुन्हे दाखल करण्याचा प्रकार झाल्याने महाराष्ट्र फर्टिलायझर पेस्टीसाईडससीड्स डीलर्स असोसिएशन च्या वतीने महारष्ट्रभरात तीन दिवसीय बंद पाळण्यात आला असुन या तीन दिवसात आष्टीत देखील हा बंद कडकडीत पाळण्यात आला असुन आष्टीत कृषी  सेवा केद्र चालकांचा बंद असल्याने शेतकऱ्यांची खतासाठी व औषधी साठी  भटकंती करताना दिसुन येत होते तर आष्टीचे सीड्स व फर्टिलायझर अध्यक्ष गंगाधर सोळंके यांना या विषयी विचारणा केली असता ते म्हणाले की शासनाने परवानगी दिलेल्या कंपन्याचे बियाणे आम्ही विक्री करीत असुन बियाणे न उगवणे  हि आमची जबबदारी कशी याचा जाब शासनाने संबंधित कंपन्यांना विचारावा नाहक विक्रेत्यावर गुन्हे दाखल करणे हा आमच्यावर अन्याय असुन शासनाने हा निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी केली तर शासनाने या सोयाबीन प्रकरणी संबंधित कंपन्यावर काय कार्यवाही करणार ते होत राहील मात्र ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणी केली पण उगवली नाही त्यांना नुकसान भरपाई कश्या प्रकारे करून देणार हा प्रश्न देखील शेतकरी वर्गातून बोलला जात असुन या प्रकरणात शेतकऱ्याच्या पदरात काय पडते त्या कडे सध्या बळीराजाचे लक्ष लागले हे मात्र खरे .


Popular posts
भाजपाच्या प्रदेश कार्यसमितीवर बद्रीनाथ पठाडे यांची निवड
Image
कोवीड१९च्या पार्श्वभूमीवर जुना जालना विभागात  नगरसेवक आणि पोलिसांची मोटारसायकल रॅली
Image
चंदनझीरा येथे कोरोना स्वॕब टेस्ट शिबिराला सुरूवात. नगरसेविका मालनबाई दाभाडे यांनी स्वतः स्वॕब तपासणी करून नागरीकांचे मनोबल ऊंचावले.
Image
केंद्रीय राज्यमंत्री ना. रावसाहेब पा. दानवे यांनी दखल घेताच टाकळी कोलतेचे पीक विमा ऑनलाईन पोर्टलमध्ये नाव सामाविष्ट
Image
जालना शहरातील प्रभाग क्र.25 (ब) मध्ये आरोग्य सर्वेक्षण संपन्न 
Image