संचारबंदीचे ऊल्लंघन करणाऱ्या विविध विक्रेत्यांवर गुन्हे दाखल. सदर बाजार पोलीसांची कारवाई.


◾लोकाधीकार / स्वरूप गुरूबानी ,
जालना दि.१३
सध्या कोरोणा विषाणुचा फैलाव हा मोठ्या प्रमाणावर होत असल्याने जगभर भितीचे वातावरण
निर्माण झाले आहे. जालना शहरात मागील काही दिवसात कोरोनाचे रुग्ण वाढत
असल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून मा. जिल्हाधिकारी श्री रविंद्र बिनवडे साहेब यांनी दहा दिवसांसाठी संचारबंदी
जाहीर करुन सर्व आस्थापणा बंद ठेवणे बाबत चे आदेश जारी केलेले आहेत.
मा. जिल्हादंडाधिकारी साहेब यांनी संचारबंदी व सर्व आस्थापणा बंद ठेवणे बाबतचे आदेश
दिलेले असताना सुध्दा काही दुकानदार हे आदेशाची पायमल्ली करुन स्वत:चे आर्थीक फायदया साठी दुकाने उघडुन ग्राहकाची गर्दी जमवुन संचार बंदीचे पालन करत नसल्याचे निदर्शनास आल्यावरुन श्री संजय देशमुख, पोलीस निरीक्षक,पोलोस ठाणे सदर बाजार जालना यांनी स्वत: शहरात गल्ली पेट्रोलींग करुन दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे.


              
भाजी विक्रेते, फळ विक्रेते, मटण, चिकन विक्रेते, टोस्ट आणि ब्रेड विक्रेते, किराणा दुकानदार, कृषी सेवा केंद्र अशा दुकानदारांवर संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच काहींना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे. सदरील कारवाई संचारबंदी काळात चालू राहील. कोरोना चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सोशल डिस्टंसिंग आणि प्रशासनाच्या निर्बंध घातलेल्या बाबींचा उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. जिजामाता उद्यान, फुलबाजार, दानाबाजार, टागा स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, अशा मुख्य ठिकाणी पोलिस प्रशासनाच्या वतीने पेट्रोलिंग करून संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर कठोर कारवाई करण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक केलेली आहे. 
-- संजय देशमुख 
 पो.नि.सदर बाजार 
पोलीस स्टेशन, जालना.


Popular posts
चंदनझीरा येथे कोरोना स्वॕब टेस्ट शिबिराला सुरूवात. नगरसेविका मालनबाई दाभाडे यांनी स्वतः स्वॕब तपासणी करून नागरीकांचे मनोबल ऊंचावले.
Image
अंगणवाडी सेविका आरोग्यकर्मचारी यांच्या मार्फत हकीम मोहल्ला,टटूपुरा,या ठिकाणी सर्वेक्षण करण्यात येत आहे
Image
अत्यावश्यक सेवांची दुकाने सुरु ठेवण्यासाठी वेळा निश्चित कोव्हीड-19 च्या अनुषंगाने लॉकडाऊनच्या काळात नागरिकांची अत्यावश्यक वस्तुंची खरेदीसाठी
Image
शहरात 400 दिवसा पासून पाझर संस्था भूकेल्यांची भूक भागवत आहे..
Image