कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रमजान ईद पर्यंत मार्केट ऊघडण्यास परवानगी देऊ नये. -- ईत्तेहाद सोशल फाऊंडेशन  यांचे जिल्हाधिका-यांना निवेदन.



शब्बीर पठाण


जालना दि.05
कोरोना वायरस चा प्रादुभाव रोखण्यासाठी रमजान ईद पर्यंत खरेदी साठी अत्यावश्यक सेवे मध्ये न येणारे मार्केट उघडण्याची परवानगी देण्यात येऊ नये अशा आशयाचे निवेदन
ईत्तेहाद सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने मा. जिल्हाधिकारी, जालना यांना देण्यात आले.



 जालना शहरात COVID-19 चा प्रादुभाव दिवसे दिवस वाढतच असून महाराष्ट्र राज्याची परिस्थितीअत्यंत बिकट असून त्या अनुषंगाने रमजान ईद साठी जालना मध्ये खरेदी साठी कपड़ा, रेडीमेट, अथवा शुज चे दुकान आपण उघडण्याची परवानगी  दिली तर मार्केट मध्ये गर्दी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. SOCIAL DISTANCING चा प्रोब्लेम
झाला, व एखादा रुग्ण गर्दी मध्ये अनेक लोकांच्या संपर्कात आला तर स्थिती बिघडण्यास वेळ लागणार नाही.


काही जिल्ह्यांमध्ये मद्यविक्रीच्या दुकानांना परवानगी दिली असता,सोशल डिस्टेन्सिंग च्या नियमाचे तीनतेरा वाजले, तसेच सम,विषम फार्मुलाही फेल ठरला.आणि लोकांची एकच झुंबड ऊडाली.


महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व जिल्हा प्रशासन या संकटातून जनतेला वाचविण्यासाठी अहोरात्र प्रघत्न करित आहेत.  आम्ही मुस्लिम
समाजात सुध्दा दिवस रात्र मेहनत घेत आहोत.त्या पार्श्वभूमीवर जालना  रुग्णांची संख्या दिवसे दिवस वाढत असून करोना चा प्रकोप
थांबविण्यासाठी मार्केट बंद राहणेच गरजेचे आहे. मार्केट सुरु झाल्यास रुग्णांची संख्या वाढण्यासाठी कारण बनेल व एखादा प्रसंग भोवला
तर  मुस्लिम विरोधात तेढ निर्माण होईल हे नकारता येत नाही. तर आपण सर्व बांबीवर व शहराची बिकट परिस्थिती
पाहता रमजान महिना अथवा ईद साठी मार्केट उघडण्याची कोणत्याही परिस्थितीत परवानगी देवू नये.
 असे ईत्तेहाद सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने मा. जिल्हाधिकारी,जालना यांना निवेदन देण्यात आले आहे.


*सदरील निवेदनावर ईत्तेहाद सोशल फाऊंडेशन चे हाफेज सय्यद अ.अजीम (अध्यक्ष) शब्बीर पठाण (सचिव) सय्यद नय्युम (सल्लागार) यांच्या स्वाक्ष-या आहेत.*


Popular posts
संचारबंदीचे ऊल्लंघन करणाऱ्या विविध विक्रेत्यांवर गुन्हे दाखल. सदर बाजार पोलीसांची कारवाई.
Image
कोवीड१९च्या पार्श्वभूमीवर जुना जालना विभागात  नगरसेवक आणि पोलिसांची मोटारसायकल रॅली
Image
चंदनझीरा येथे कोरोना स्वॕब टेस्ट शिबिराला सुरूवात. नगरसेविका मालनबाई दाभाडे यांनी स्वतः स्वॕब तपासणी करून नागरीकांचे मनोबल ऊंचावले.
Image
अंगणवाडी सेविका आरोग्यकर्मचारी यांच्या मार्फत हकीम मोहल्ला,टटूपुरा,या ठिकाणी सर्वेक्षण करण्यात येत आहे
Image