कडक संचारबंदीतही जालन्यात अवैध दारु विक्री जोरात. कदीम जालना पोलीलांची धडक कारवाई.


◾लोकाधीकार/शब्बीर पठाण 
जालना दि.१२
कोरोना महामारीच्या अनुषंगाने सध्या जालना शहरात 5 ते 15 जुलै दरम्यान कडक संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. 


परंतु या संचारबंदीचा फायदा घेत अवैध धंदे करणारेही शहरात बोकाळले आहेत. अशा प्रकारे अवैध दारु विक्री करणाऱ्या नूतन वसाहत परिसरातील एकाच्या कदिम जालना पोलिसांनी शनिवारी मुसक्या आवळल्या असुन त्याच्या ताब्यातील तब्बल 69 हजारांची दारु जप्त केली आहे.
नुतन वसाहत परिसरातील दत्ता गोरखनाथ जाधव हा संचारबंदी काळात अवैध मद्यसाठा करुन विक्री करीत असल्याची माहीती कदिम जालना पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी नुतन वसाहत परिसरातील दत्ता जाधव याच्या घरी छापा मारला असत्या त्याच्या घरात विविध देशी विदेशी कंपन्यांच्या मद्याच्या बाटल्या पोलिसांना आढळून आल्या. 
◾ मॕकडाॕल्स नं. 1 च्या 240 नग अंदाजे किंमत 3600
◾ आय,बी. च्या 96 नग किंमत 13400
◾ आॕफीसर चाॕईस च्या 96 नग किंमत 11500
◾ देशी दारू च्या 144 नग 8640 
ईत्यादी साठा पोलीसांनी संशयीत आरोपी दत्ता जाधव याच्या घरातून 69 हजार रुपयांची दारु जप्त केली असुन आरोपीस अटक केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 


सदरील कारवाई पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खीरडकर, यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, पो.नि. पोवार, पो.नि. बनसोडे मॅडम, यांच्यासोबत जावळे, सावळे, जोंधळे, लहामगे, खांडे, पवार, सपकाळ, इत्यादी अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने कारवाई करण्यात आली.


Popular posts
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तात्पुरते निवृत्तिवेतन मिळणार सेवा पुस्तिका पडताळणीस विलंब होत असल्याकारणाने शासनाचा निर्णय
Image
जालना शहरातील प्रभाग क्र.25 (ब) मध्ये आरोग्य सर्वेक्षण संपन्न 
Image
अंगणवाडी सेविका आरोग्यकर्मचारी यांच्या मार्फत हकीम मोहल्ला,टटूपुरा,या ठिकाणी सर्वेक्षण करण्यात येत आहे
Image
संचारबंदीचे ऊल्लंघन करणाऱ्या विविध विक्रेत्यांवर गुन्हे दाखल. सदर बाजार पोलीसांची कारवाई.
Image
कोवीड१९च्या पार्श्वभूमीवर जुना जालना विभागात  नगरसेवक आणि पोलिसांची मोटारसायकल रॅली
Image