◾लोकाधीकार/स्वरूप गुरबानी
जालना दि.१२
सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश चव्हाण यांची सतत दुसऱ्या दिवशी धडाकेबाज कारवाई करत सकाळी 2 तासात 10 जणांवर गुन्हे दाखल केले. असुन सतत दुसऱ्या दिवशी सदर बाजार पोलीस यांनी केलेल्या कारवाई मुळे आज सकाळ पासून रस्त्यावर शुक शुकाट आहे.
कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जालना शहरात 15 जुलै प्रर्यत संचार बंदी लागु केलेली आहे. जालना शहरात सर्वत्र संचारबंदीची कडक अंमलबजावणी होत असताना काही महाभाग मा.जिल्हाअधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करीत आहेत. आज सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश चव्हाण व त्यांच्या पथकाने यांनी सकाळी 6 वाजल्या पासुन धडाकेबाज कार्यवाई केली. यामध्ये विविध भागात लोकांची गर्दी करुन भाजीपाला विक्री करणाऱ्या 8 भाजीपाला विक्रेत्यावर 1 हाॅटेल चालकावर ,01 टोस्ट विक्री करणाऱ्यावर सदर बाजार पोलिस ठाण्याचे व काद्राबाद चौकी इंचार्ज पोलिस उपनिरीक्षक. योगेश चव्हाण यांनी गुन्हे दाखल केले. पोलीस उपनिरीक्षक योगेश चव्हाण यांनी सांगितले मा.पोलीस निरीक्षक एस. चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सदर बाजार पोलीस जालना शहरात कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव कसा रोखता येईल याबाबत संचारबंदीची कडक अंमलबजावणी कशी करता येईल व कोरोना वायरस आटोक्यात कसे आणता येईल याबाबत आम्ही चौवीस तास बंदोबस्त, पेट्रोलींग करत आहोत.
जालनाकर पण आम्हाला घरात थांबुन सहकार्य करावे.. जे कोणी मा.जिल्हा अधिकारी साहेब यांचे आदेशाचे उल्लंघन करतील त्यांच्या वर आम्ही कायदेशीर कारवाई करु. आम्ही सर्व शहर वासीयां साठी रस्त्यावर आहोत याची पण शहरवाशीनी दखल घेतली पाहिजे..
कोरोना वायरस संपुष्टात आणण्यासाठी लोकांचे सहकार्य पण खुप आवश्यक आहे.