जालनेकरांची प्रभाग निहाय होणार स्वॅब टेस्टींग.



◾लोकाधीकार /शब्बीर पठाण,
जालना दि.१०
जालना शहरात ३६ स्पॉट वर मोबाईल रूग्णवाहिकेद्वारे संवेदनशील व्यक्तींसाठी टेस्टींग सुविधा उपलब्ध होणार आहे.
 जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी आज टाऊन हॉल येथील सभागृहात मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, आरोग्य अधिकारी व नगरसेवक यांची संयुक्त बैठक घेऊन या विषयावर सविस्तर माहिती दिली. प्रत्येक प्रभागात २० व्यक्तींचे हायरिस्क असलेल्यांचेच स्वॅब टेस्टींग केली जाणार आहे. अशा व्यक्तींची यादी नगरसेवक यांना दिली जाईल . गर्दी टाळून केवळ संबंधित व्यक्तीचेच स्वॅब घेतले जातील.


 अँटीजेन टेस्टींग ( नवा पर्याय) :
स्वॅब टेस्टींग सोबतच अँटीजेन टेस्टींग नवीन प्रणाली उपलब्ध झाली आहे. लक्षणे असलेल्या व्यक्तींना या द्वारे टेस्टींग केली जाण्यासाठी नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी दिली. 
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी सांगितले की,
३६ स्पॉट जालना शहरात निवडले आहे. ३६ स्पॉट यादी जाहीर केली असून जालन्यातील नगर सेवकासोबत बैठक आयोजित करुन या ३६ स्पॉट मध्ये हायरिस्क असे सॕम्पलचे नमुने घरपोहच घेतले जातील.



शिवसेना गट नेते विजय पवार शिवसेना शहर प्रमुख तथा नगरसेवक विष्णु पाचफुले यांची सभागृहात मागणी
 कोव्हिड१९ रुग्णाचे  बळी  झाले तर सर्वजाती धर्माच्या लोकांसाठी    नगरपालिकाने  खर्च करावा. असा आवाज  शिवसेना शहर प्रमुख तथा  नगरसेवक विष्णु  पाचफुले तसेच  शिवसेना गटनेते विजय पवार  यानी मुद्दा मांडला. नगरपालिकेच्या नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी  तात्काळ 10 लाख ची तरतुद करून लगेच मंजूर करण्यात आली. नगरपालिका    अंत्यसंस्कारासाठी लागनारे    व दफन विधी साठीचा   खर्च नगरपालिका करणार आहे असे स्पष्ट केले.


कोव्हीड१९  हॉस्पिटल मधील  डाॅ डि.पी. चव्हाण यांनी कोरोनावर मात करण्यासाठी उपयोजना कशा पध्दतीने करता येईल असे जनतेला अवाहन केले.


Popular posts
भाजपाच्या प्रदेश कार्यसमितीवर बद्रीनाथ पठाडे यांची निवड
Image
कोवीड१९च्या पार्श्वभूमीवर जुना जालना विभागात  नगरसेवक आणि पोलिसांची मोटारसायकल रॅली
Image
चंदनझीरा येथे कोरोना स्वॕब टेस्ट शिबिराला सुरूवात. नगरसेविका मालनबाई दाभाडे यांनी स्वतः स्वॕब तपासणी करून नागरीकांचे मनोबल ऊंचावले.
Image
केंद्रीय राज्यमंत्री ना. रावसाहेब पा. दानवे यांनी दखल घेताच टाकळी कोलतेचे पीक विमा ऑनलाईन पोर्टलमध्ये नाव सामाविष्ट
Image
जालना शहरातील प्रभाग क्र.25 (ब) मध्ये आरोग्य सर्वेक्षण संपन्न 
Image