काऱ्हाळा विज केंद्राच्या ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड कोट्यावधीच्या खर्चातून निर्माण झालेले 33 केव्ही काही महिन्यातच नादुरुस्त!   विजपुरावठा सुरळीत होत नसल्याने ग्रामस्थांतून तिव्र संताप!


मारोती जवळकर
आष्टी/ परतुर


 तालुक्यातील काऱ्हाळा येथे नव्यानेच निर्माण झालेल्या 33 केव्हीमध्ये मोठा बिघाड झाला असून कोट्यावधी रुपयांचा खर्च करून देखील अवघ्या काही महिन्यातच विज केंद्र नादुरुस्त झाल्याने येथील अनेक गावांचा विजपुरवठा सुरळीत होत नसल्याने ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
         याविषयी अधिक माहिती अशी की,
भारत सरकारच्या ग्रामीण विद्दुत वितरण व्यवस्थेचे सशक्तीकरण व्हावे  याकरिता शासनाकडून दिनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना सुरू करण्यात आली आणि या योजने  अंतर्गत परतूर तालुक्यातील काऱ्हाळा येथे ३३ केव्ही उपकेंद्राचे निर्माण करण्यात आले,



शासनाने करोडो रुपये खर्च करून मागील काही महिन्यांपूर्वी या उपकेंद्राचे लोकार्पण माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात केले गेले,मात्र मागील काही दिवसापूर्वी पॉवर ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड झाला असून  काऱ्हाळा सह इतर काही  गावातील नागरिकांना विजेच्या समस्या निर्माण झाल्या आहेत, या गावांसाठी तात्पुरती व्यवस्था म्हणून सुरुंमगाव येथील फिडर मधून विज पुरवठा देण्यात आला आहे मात्र त्यावर अतिरिक्त भार पडत असल्याने कायम विजेचा लपंडाव चालू असल्याचे गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे,नुकत्याच निर्माण केलेल्या 33 केव्ही मध्ये अवघ्या काही महिन्यातच बिघाड झाला असल्याने या कामाबाबत शंका उपस्थित केली जात असून काम करणाऱ्या एजन्सीकडे याची जबाबदारी असल्याचे सांगण्यात आले आहे, केवळ तीन गावाच्या तीन हजार लोकसंख्येसाठी करोडो रुपये खर्च करून राबविण्यात आलेली दिन दयाळ उपाध्याय ग्रामज्योति योजना पूर्णतः फोल ठरत असून या महत्वकांक्षी योजनेचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र दिसून येत असल्याने ग्रामस्थांतुन याबाबत तिव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.याविषयी महावितरण  चे आष्टीचे सहायक अभियंता सानप यांच्याशी संपर्क साधला असता काऱ्हाळा विजकेंद्रावर विज पडल्याचे कारण सांगत दुरुस्तीची जबाबदारी ही काम करणाऱ्या एजन्सीची आहे व बिघाड झालेले ट्रान्सफार्मर दुरुस्ती साठी राज्यस्थान येथे पाठविण्यात आले असून आणखीन किती दिवस लागतील हे सांगता येत नाही असे सांगून आम्ही एजन्सीला पत्रव्यवहार केला आहे आणि त्याचा पाठपुरावा देखील करत आहोत असे श्री सानप यांनी सांगितले.


Popular posts
भाजपाच्या प्रदेश कार्यसमितीवर बद्रीनाथ पठाडे यांची निवड
Image
कोवीड१९च्या पार्श्वभूमीवर जुना जालना विभागात  नगरसेवक आणि पोलिसांची मोटारसायकल रॅली
Image
चंदनझीरा येथे कोरोना स्वॕब टेस्ट शिबिराला सुरूवात. नगरसेविका मालनबाई दाभाडे यांनी स्वतः स्वॕब तपासणी करून नागरीकांचे मनोबल ऊंचावले.
Image
केंद्रीय राज्यमंत्री ना. रावसाहेब पा. दानवे यांनी दखल घेताच टाकळी कोलतेचे पीक विमा ऑनलाईन पोर्टलमध्ये नाव सामाविष्ट
Image
जालना शहरातील प्रभाग क्र.25 (ब) मध्ये आरोग्य सर्वेक्षण संपन्न 
Image