आता थेट गुन्हे दाखल करून, वाहने जप्त करण्यात येतील. -- संजय देशमुख (पो.नि.सदर बाजार)


लोकाधीकार/शब्बीर पठाण
जालना दि.८ 
जालना शहरामध्ये कोरोना बाधीतांची संख्या आठशेच्या वर गेलेली आहे.तसेच आजपर्यंत ३५जनांचा कोरोनाने बळी गेला आहे. कोरोना विषाणु संसर्गजन्य रोगाचा
वाढता प्रादुर्भाव  रोखण्यासाठी मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे.संचारबंदी लागू चा आदेश पारित होताच सदर बाजार पो. ठाण्याच्या वतीने सदरील आदेशाची काटेकोरपणे अमलबजावणी करण्यात येत आहे. विनाकारण बाहेर फिरणाऱ्या वाहनधारकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील तसेच वाहने जप्त कारण्यात येतील. याची नागरीकांनी नोंद घ्यावी. असा कडक ईशारा पो.नि. संजय देशमुख यांनी दिला आहे.



संचारबंदीच्या काळात विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नये, मास्कचा वापर करावा,स्वताःची व ईतरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपने पालन करावे. जिल्हाप्रशासन व पोलीस प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे नागरीकांनी पालन केले तर जिल्ह्यातील कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होईल.
 विनाकारण बाहेर फिरताना आढळून आले तर नाईलाजास्तव पोलिस प्रशासनास बळाचा वापर करावा लागेल परंतु नागरिकांनी अशी वेळ येऊ देऊ नये.
मा. पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, मा.अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खीरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार पोलीस ठाण्याचे पो. निरीक्षक संजय  देशमुख, पोलिस उप निरीक्षक योगेश चव्हाण, पोलिस कर्मचारी. तेलंगे, कांबळे, यांच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे.


तरी सर्व नागरीकांनी वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करावे व पोलीस प्रशासनास सहकार्य करावे. असे अवाहन सदर बाजार पोलीस ठाण्याचे पो. निरीक्षक श्री संजय देशमुख यांनी केले.


Popular posts
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तात्पुरते निवृत्तिवेतन मिळणार सेवा पुस्तिका पडताळणीस विलंब होत असल्याकारणाने शासनाचा निर्णय
Image
जालना शहरातील प्रभाग क्र.25 (ब) मध्ये आरोग्य सर्वेक्षण संपन्न 
Image
अंगणवाडी सेविका आरोग्यकर्मचारी यांच्या मार्फत हकीम मोहल्ला,टटूपुरा,या ठिकाणी सर्वेक्षण करण्यात येत आहे
Image
संचारबंदीचे ऊल्लंघन करणाऱ्या विविध विक्रेत्यांवर गुन्हे दाखल. सदर बाजार पोलीसांची कारवाई.
Image
कोवीड१९च्या पार्श्वभूमीवर जुना जालना विभागात  नगरसेवक आणि पोलिसांची मोटारसायकल रॅली
Image