जालना / प्रतिनिधी
जालना जिल्ह्यात जून आणि जुलै या दोन महिन्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला असल्याचे प्रशासनाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारी वरून स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात कोरोनाचा अधिक प्रादुर्भाव असलेले एकूण 27 हॉटस्पॉट असून त्यातील तब्बल 21 हे जालना शहरातील आहेत हे विशेष. सरकारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील जे 21 हॉटस्पॉट झोन आहेत ते झोन आणि झोन निहाय कोरोना बाधीत रुग्ण आढळून आलेली संख्या पुढील प्रमाणे आहे.SRPF जालना 37, काद्राबाद 37, मोदीखाना 35, मिशन हॉस्पिटल(तलरेजा नगर) 23, संभाजीनगर 20, दानाबाजार 19, मंगलबाजार 18, रहेमान गंज 17, खडकपुरा 16, बन्सीपुरा 15, गुडलागल्ली 14, बाळजीनगर,नाथबाबा गल्ली प्रत्येकी 12,बुऱ्हाणनगर,लक्कडकोट प्रत्येकी 11,जेईएस कॉलेज रोड, विणकर कॉलनी प्रत्येकी 9,जेपीसी बॅंक कॉलनी,लक्ष्मीनारायनपुरा प्रत्येकी 8, श्री कॉलनी,वसुंधरा नगर प्रत्येकी 7, या प्रमाणे असून जाफराबाद शहरातील किल्ला परिसर 11,अंबड शहरातील शारदानगर 10, तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचे केवळ चार हॉटस्पॉट झोन आढळून आले आहेत. त्यात अंबड तालुक्यातील मठपिंपळगाव 10, जाफराबाद तालुक्यातील टेम्भुर्णी 27,मंठा तालुक्यातील नानसी 11 आणि परतूर तालुक्यातील मापेगाव 9 या प्रमाणे आहे.दरम्यान, या उपलब्ध आकडेवारी वरून कोरोनाच्या संदर्भात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ग्रामीण भागात अधिक प्रभावीपणे केलेले काम आणि कोरोना विरुद्धच्या लढाईत गावागावात एकवटलेले ग्रामस्थ यामुळे ग्रामीण भागात कोरोनाला वेळीच अटकाव घालण्यात यश आले आहे. जिल्हाधिकारी रविंद बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर,जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. संतोष कडले, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि आरोग्य यंत्रणेतील सर्व सहकारी अधिकारी,कर्मचाऱ्यांचे या लढाईत मोठे योगदान राहिले आहे. महत्त्वाचे म्हणजे जिल्हा सरकारी रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.अशवमेध जगताप,डॉ.संजय जगताप यांच्यासह जिल्हा रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्य कर्मचारी आणि सर्व संवर्गातील कर्मचारी दिवसरात्र परिश्रम घेऊन कोरोना बाधीत रूग्णांवर निडरपणे उपचार करत आहेत. मात्र शहरी भागातील नागरिक विशेषतः तरुण मंडळीकडून नियमांचे उल्लंघन होत असून जिल्हा प्रशासन,नगर परिषद प्रशासन यांच्या आवाहना कडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळेच शहरी भागात कोरोना बाधीत रूग्णांची संख्या ग्रामीण भागाच्या तुलनेत अधिक असल्याचे दिसून येत आहे. शहरी भागातील जनतेने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन घरीच सुरक्षित राहून जिल्हा प्रशासन आणि नगर परिषद प्रशासनाला मदत केल्यास ग्रामीण भागात ज्या पध्दतीने कोरोनाला रोख लावण्यात यश आले तसे यश मिळवणे कठीण जाणार नाही असा विश्वास सरकारी सुत्रांनी व्यक्त केला आहे
प्रशासनाच्या नियमांचे शहरातील तरुणांनी उल्लंघन केल्याने ही बिकट परिस्थिती जालना जिल्ह्यात कोरोनाचे 27 हॉटस्पॉट झोन