जालना / प्रतिनिधी
बहुजनांचे कैवारी आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांची जयंती आज रोजी गटनेता विजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली मोतीबाग जवळील राजे संभाजी चौक येथे साजरी करण्यात आली आहे.राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेस विजय पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आहे. यावेळी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त जयंतीनिमित्त सर्व बहुजन समाजाला शुभेच्छा ही गतनेता विजय पवार यांनी दिल्या.यावेळी दीपक जाधव, सचिन निकाळे, वानखेडे, झिगे पाटील देशमुख राजे आदींची उपस्थिती होती.