कोरोना पासून बचाव आणि कोरोनाशी आपला लढा..
-डाॕ.भागवत काळे
चंदनझीरा,जालना.
संपुर्ण जग जेव्हा नुतन वर्षाच्या स्वागतासाठी आतुरलेलं होते अर्थातच डिसेंबर 2019 च्या शेवटच्या आठवडय़ात तेव्हा अचानक ज्या नैसर्गिक कमी, मानवनिर्मित आपत्तीने चीन मधील वुहान या शहरात जन्म घेतला ती वैश्विक आपत्ती म्हणजे नोव्हेल कोरोना व्हायरस(covid - 19).
आपण सर्वजण मागील काही दिवसांपासून या कोरोना व्हायरस(विषाणू) विषयी या विषाणूच्या संसर्गा विषयी आणि संसर्ग झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या लक्षणाविषयी ऐकुण आहात. शेजारील विकसित राष्ट्रे (देश) सर्व बाबतीत स्वयंपूर्ण असतांनी देखील त्यांची आजची स्थिती पाहता कोरोना विषाणू संक्रमण रोखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करुण देखील ते या संसर्गातुन होणारी जिवितहानी रोखु शकले नाहीत. नकळतपणे हे देश आज आर्थिक, सामाजिक, वैयक्तिक, मानसिक दृष्ट्या, शारीरिक दृष्टीने खचले आहेत हे आपण पाहत आहोत. सर्वकश समृद्धी असणार्या देशांनी या आपत्ती समोर हात टेकवले. चीन, इटली, स्पेन, इराण, यांची उदाहरणे आपल्या सर्वांच्या समोर आहेत. रोज सोशल मीडिया, मंत्र्यांच्या पञकार परिषदा, शासकीय जाहिरात, यांच्या माध्यमातून आपण लागण झालेल्या रुग्णांची झपाट्याने वाढत असलेली संख्या पाहत आहोत.. शेजारच्या देशामधील हा विषाणूसंसर्ग हो हो म्हणता आपल्या देशात, राज्यात, जिल्हात आला तरी देखील आपण नेहमीप्रमाणे विविध प्रकारच्या मीम्स व जोक्स बनवण्याच्या नादात.. आणि काही होत नाही च्या अविर्भावात. देशातील संक्रमित व्यक्तींची संख्या 174 च्या वरती आहे 6000 पेक्षा जास्त लोकांच्या तपासणी टप्पा आपण गाठला आहे... महाराष्ट्रातील स्थिती पाहता 74 लागण झालेल्या रुग्णांची नोंद आहे. प्रत्येक दिवशी या संख्येत वाढ होत आहे आणि ही बाब चिंताजनक आहे. केंद्र सरकार, राज्य शासन आपल्या परीने सर्वकश प्रयत्न करत आहेत... कशा पद्धतीने या आपत्तीचे व्यवस्थापन व निवारण करता येईल त्यासाठी ते प्रयत्नशील आहेत परंतु तेवढं पुरेसे नाही.. आपण विकसनशील देशांचे नागरिक आहोत आपली वैद्यकीय व्यवस्था पध्दती प्रगत देशांपेक्षा खुप तोकडी आहे पुरेसे व्हेटिंलेटर, तज्ञ डॉक्टर्स, परिचारिका, औषधसाठा, रूग्णालयातील खाटांची संख्या, टेस्ट कीट. या सर्व बाबींचा विचार करता आपण या बाबतीत खुपच मागासलेले आहोत.. आपल्याकडे एक प्रचलित म्हण आहे 'जान बची तो लाखो पाये" आणि हेच तुम्हाआम्हाला करायच येणाऱ्या काळात वरिल सर्व बाजूंनी विचार करून या कोरोना संसर्गाला हरवण्यासाठी, निवारणासाठी स्वत :साठि अर्थातच समाजाला वाचवण्यासाठी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून शासनाच्या सर्व नियम आणि निकषांचे पालन करायचे आहे.. तरच आपण जगु अन्यथा परिणाम आपण शेजारील देशात पाहतो आहोत. कोणत्याही गोष्टीचा संबंध कुठेही जोडण्यात आपण सर्व माहीर आहोत कुणी या संसर्ग संदर्भात ग्रंथी आधार सांगतोय तर कुणी राजकीय खेळी म्हणून हिनवतोय, कुणी शासन यंत्रणेत तृटी दाखवतोय तर कुणी प्रकोप म्हणुन या कडे पाहतोय. वरील बाबींचा गांभीर्याने विचार करूण डोळसपणाने आपणा सर्वांना येणाऱ्या काळात मार्गक्रमण करायच आहे या संसर्गाविरूध्द लढायचं आहे.. याला हद्दपार करायच आहे. आपणा सर्वांना माहीती आहेच तरी देखील परत सांगतो....
(1) कोरोना व्हायरस (विषाणूसंसर्ग) आहे.
(2)अतिशय वेगाने वाढतो, संक्रमित करतो.
(3)आपल्या श्वसन संस्थेला बाधीत करतो.
प्रसार.... कोरोना विषाणू सामान्यतः दोन प्रकारे प्रसार पावतो (1)संक्रमित व्यक्तीच्या खोल्यातून. बाधीत रूग्ण खोकल्या किंवा शिंकल्याने हवेत तुषार पसरतात.. या तुषारातील कणांमध्ये विषाणू असतात आजुबाजुच्या व्यक्तीनी श्वास घेतल्यावर त्यातुन संसर्ग होतो.
(2)वस्तुच्या स्पर्शाने.. बाधीत रुग्ण खोकल्या किंवा शिंकल्या नंतर काही तुषार विषाणूसह आजुबाजुच्या वस्तूवर पडतात.
त्या वस्तुना आपल्या हाताचा स्पर्श झाल्यास विषाणू आपल्या हाताला चिकटतात.. तेच हात आपण न धूता डोळे कान नाक व तोंडाला लावल्याने संसर्ग होतो.
कोरोना बाधीत रुग्णाची लक्षणे अतिशय साधारण असतात त्यामुळे आपल्यात जास्त भीती निर्माण होते त्यातील काही महत्त्वाचे लक्षणे खालील प्रमाणे आहेत...
(1)सर्दी
(2)घशात खवखवणे किंवा घसा तीव्रपणे दुखणे
(3)खोकला
(4)ताप
(5)श्वास घेण्यास त्रास होणे
(6)डोकेदुखी...अशक्तपणा धाप लागणे
(7)भुक मंदावणे वरील लक्षण जाणवल्यास वेळ न दवडता मान्यताप्राप्त डॉक्टरचा सल्ला घ्या. किंवा जवळच्या सरकारी रुग्णालयात जाऊन कोरोना विषाणूच्या निदानाची तपासणी करून घ्यावी.
अफवांवर विश्वास ठेवु नये.. संसर्ग न होण्यासाठी (1)डॉ सल्ल्याने मास्क वापरा
(2)गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे
(3)चेहर्यावर हात लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुवून घ्या
(4)सॅनिटायझर चा वापर करा
(5)गरज असेल तरच घरा बाहेर पडा अन्यथा घरीच थांबा
(5)शासनाच्या व वर्ल्ड हेल्थ आँर्गनायझेशन च्या नियमावलीची तंतोतंत पालन करा.
मांस अंडी व्यवस्थित शिजवून व उकडुन घ्या.
.... परत एकदा जाहिर आवाहन व नम्रपणे विनंती करतो कोरोना विषाणू संसर्गाला सहज न घेता गांभीर्याने घ्या... शासना बरोबर देशाचं व तुमचं आमचं भविष्य आता आपल्याच हातात आहे.. स्वता :ची परिवारची काळजी घेवुयात.. चला तर मग एकच संकल्प कोरोना विषाणू संसर्ग निर्मुलन... आपलाच
डॉ. भागवत डी काळे
9527585884
(चंदनझिरा, जालना)