आरपीटीसीआर लॅबची  पालकमंत्र्याकडून पाहणी  मुख्यमंत्र्याच्या हस्ते लवकरच लॅबचा शुभारंभ होणार


जालना / प्रतिनिधी


 जालना दि. 10 :-  जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात उभारण्यात येत असलेल्या आरटीपीसीआर लॅबलाराज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी आज दि. 10 जुलै रोजी भेट देत लॅबच्या उभारणीची पाहणी केली.



 संपूर्ण मराठवाड्यात अव्वल ठराव्या अशा सुसज्ज व अद्यावत  लॅबची उभारणी जालना येथे करण्यात आली असून लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या लॅबचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहितीही पालकमंत्री श्री टोपे यांनी दिली. यावेळी  जिल्हा शल्य चिकित्सक मधुकर राठोड,  डॉ. हयातनगरकर, डॉ. शेजुळे, डॉ. जगताप, यांची उपस्थिती होती.


Popular posts
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तात्पुरते निवृत्तिवेतन मिळणार सेवा पुस्तिका पडताळणीस विलंब होत असल्याकारणाने शासनाचा निर्णय
Image
कोवीड१९च्या पार्श्वभूमीवर जुना जालना विभागात  नगरसेवक आणि पोलिसांची मोटारसायकल रॅली
Image
भाजपाच्या प्रदेश कार्यसमितीवर बद्रीनाथ पठाडे यांची निवड
Image
चंदनझीरा येथे कोरोना स्वॕब टेस्ट शिबिराला सुरूवात. नगरसेविका मालनबाई दाभाडे यांनी स्वतः स्वॕब तपासणी करून नागरीकांचे मनोबल ऊंचावले.
Image
केंद्रीय राज्यमंत्री ना. रावसाहेब पा. दानवे यांनी दखल घेताच टाकळी कोलतेचे पीक विमा ऑनलाईन पोर्टलमध्ये नाव सामाविष्ट
Image