◾लोकाधीकार/सय्यद जमील
बदनापुर दि.११
कृषी विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करू नये यासह अन्य मागण्यासाठी कृषी विक्रेत्यांनी पुकारला दोन दिवसांचा बंद
विविध बी बियाणेसील बंद पाकिटात बियाणे पाठवीत असतात व विक्रेते शेतकऱ्यांना विक्री करतात मात्र एखादे बियाणे उगवले नाही तर गुन्हा विक्रेत्यावर दाखल केला जातो हा अन्याय असून शासनाने विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करू नये अशी मागणी करीत बदनापूर तालुक्यातील कृषी ग्राहक केंद्रांनी 10 ते 12 जुलै पर्यंत बंद पुकारून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे
या संदर्भात बदनापूर व तालुक्यातील कृषी ग्राहक केंद्र चालकांनी मुख्यमंत्री व तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आपल्या मागण्या मांडल्या असून तालुका कृषी अधिकारी ठक्के यांनी मागण्या शासनास तातडीने कळविले जातील असे आश्वासन दिले दरमयन कृषी ग्राहक केंद बंद असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे