शहरात 400 दिवसा पासून पाझर संस्था भूकेल्यांची भूक भागवत आहे..

.



◾लोकाधीकार/शब्बीर पठाण 
जालना 
 जालना शहरात कोरोनाच्या काळातच नाही तर 365 दिवस गरीब,गरजू,वृद्ध रोड बाजूच्या बेघर लोकांचे अन्न न मिळाल्याने हाल होतात. याचा पाझर संस्थे कडून सर्वे करण्यात आला..अनेक अडचणी वर मात करून 16 एप्रिल 2019 पासून जालना शहरात रोड बाजूच्या बेघर,वृद्ध,आजारी,दिव्यांग लोकांसाठी पाझर रोटी बँक सुरू करण्यात आली. या लोकांना पाझर संस्थेकडून 3 पोळी,भाजी रोज तर  पुलाव,उपमा,शिरा,स्वीट पदार्थ आठवड्यात एक वेळेस दिले जातात. सभासद आपला वाढदिवसामध्ये होणार खर्च टाळून गरीब,गरजूंना अन्नदान करण्याचे पवित्र्य कार्य करतात. ग्रुप मधील सदस्य हे महिन्यात एक वेळेस अन्नदान साठी समोर येतात व मोठ्या आदर भावाने अन्नदान करतात. गेल्या 400+ दिवसापासून अन्नदान अविरत चालू आहे.



जेवणा बरोबर त्यांना नवीन कपडे,चप्पल, मेडिकल, पौष्टिक अन्नपदार्थ ही संस्थेकडून दिले जातात. कोरोना काळातही 23 मार्च 2020 पासून संस्था जुलै 2020 अन्नदान अविरतपणे करत आहे व lock down मूळे यांच्या भुकेचा प्रश्न अजून गंभीर झाला आहे..लॉक डाऊन मध्ये कोरोनाची कोणतीही भीती न बाळगता संपूर्ण सुरक्षासह संस्थेकडून आतापर्यंत 38,000 पेक्षा आधिक गरजू लोकांना अन्न वाटप चे काम करण्यात आले आहे..



           चौकट
 जालना शहरातील एकही गरीब,गरजू उपाशी राहू यासाठी निस्वार्थी हेतूने पाझर रोटी बँक ही संकल्पना समोर आली..व या माध्यमातून आम्ही मागील 400 दिवसांपासून गरिबांची भूक भागवत आहोत..यामध्ये पाझर च्या प्रत्येक सभासदांचे लाख मोलाचे सहकार्य...अनेक दान दात्यांचे मदतीचे हात.. व सर्व हितचिंतक यांचे आम्ही आभार मानतो...आपणही या पवित्र्य कार्यात सहभागी होऊन आपले योगदान करू शकता.. - सुनिल कुऱ्हे..पाझर सेवाभावी संस्था,जालना..


Popular posts
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तात्पुरते निवृत्तिवेतन मिळणार सेवा पुस्तिका पडताळणीस विलंब होत असल्याकारणाने शासनाचा निर्णय
Image
जालना शहरातील प्रभाग क्र.25 (ब) मध्ये आरोग्य सर्वेक्षण संपन्न 
Image
अंगणवाडी सेविका आरोग्यकर्मचारी यांच्या मार्फत हकीम मोहल्ला,टटूपुरा,या ठिकाणी सर्वेक्षण करण्यात येत आहे
Image
संचारबंदीचे ऊल्लंघन करणाऱ्या विविध विक्रेत्यांवर गुन्हे दाखल. सदर बाजार पोलीसांची कारवाई.
Image
कोवीड१९च्या पार्श्वभूमीवर जुना जालना विभागात  नगरसेवक आणि पोलिसांची मोटारसायकल रॅली
Image