सचारबंदीतही कोरोनाचा कहर कायम  आज जालन्यात 44 नवीन कोरोना रुग्ण  


 जालना / प्रतिनिधी
जालना जिल्ह्यात आज शनिवारी दुपारी आणखी 44 संशयीत रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले असून या वाढलेल्या संख्येमुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या आता 952 इतकी झाली आहे.आज नव्याने आढळून आलेल्या 44 रुग्णांमध्ये तब्बल 42 जण हे जालना शहरातील असून त्यात सर्वाधिक 13 जण हे गांधीनगर भागातील आहेत.त्यापाठोपाठ सात रुग्ण हे रामनगर येथील असून सहा रुग्ण कन्हेयानगर येथील आहेत.मोदीखाना,जिजामाता कॉलनी,नलगल्ली, तुळजाभवानी नगर मस्तगड या भागातील प्रत्येकी दोन तसेच नाथनगर, पेन्शनपुरा, युनियन बॅंक, माऊली नगर,पिवळा बंगला, भाग्यनगर,संभाजीनगर, जीएस कॉलेज रोड या भागातील प्रत्येकी एक,चिंचखेड 1 आणि देऊळगाव राजा येथील सप्तश्रृंगी नगर येथील 1 या प्रमाणे रुग्ण आढळून आले असल्याची माहिती सरकारी सुत्रांनी दिली आहे


Popular posts
भाजपाच्या प्रदेश कार्यसमितीवर बद्रीनाथ पठाडे यांची निवड
Image
कोवीड१९च्या पार्श्वभूमीवर जुना जालना विभागात  नगरसेवक आणि पोलिसांची मोटारसायकल रॅली
Image
चंदनझीरा येथे कोरोना स्वॕब टेस्ट शिबिराला सुरूवात. नगरसेविका मालनबाई दाभाडे यांनी स्वतः स्वॕब तपासणी करून नागरीकांचे मनोबल ऊंचावले.
Image
केंद्रीय राज्यमंत्री ना. रावसाहेब पा. दानवे यांनी दखल घेताच टाकळी कोलतेचे पीक विमा ऑनलाईन पोर्टलमध्ये नाव सामाविष्ट
Image
जालना शहरातील प्रभाग क्र.25 (ब) मध्ये आरोग्य सर्वेक्षण संपन्न 
Image