कोरोनाचा कहर थांबेना,एकुण 41 पैकी 40 जालना शहरातील रुग्ण मृतातही वाढ


 


जालना / प्रतिनिधी
लोकडाऊन सुरू असताना सुद्धा कोरोनाचे रुग्ण थांबण्यास तयार नाही .जालना शहरात कोरोनाचा पुन्हा जोरदार भडका उडाला असून नव्याने कोरोना बाधीत आढळून आलेल्या एकूण 41 पैकी तब्बल 40 रुग्ण हे जालना शहरातील असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे  जिल्हा प्रशासनासह शहरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधीत रूग्णांची संख्या आता 914 वर पोहचली आहे.आज शुक्रवारी सकाळी 8 आणि त्यानंतर दुपारी 13 असे 21 रुग्ण सकाळपासून समोर आले असतानाच आता पुन्हा 41 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. या 41 पैकी केवळ एक रुग्ण हा परतूर तालुक्यातील शिंगोना येथील असून उर्वरीत 40 रुग्ण हे जालना शहरातील आहेत.त्यात साईनगर 4,क्रांतीनगर, सुवर्णकार नगर, आणि संभाजीनगर या भागातील प्रत्येकी 3,काद्राबाद,गवळी मोहल्ला आणि गणपती गल्लीतील प्रत्येकी 2 तसेच अयोध्या नगर,अमित हॉटेल जवळ,जुना खवा मार्केट, कन्हेयानगर,ढवलेश्वर,  कवाडीपुरा,रामनगर जालना,सदर बाजार,कालिकुर्ती, आशिर्वाद नगर,मिशन हॉस्पिटल जवळ,एस. टी. कॉलनी,ग्रीनपार्क, अंबड चौफुली, गोपिकीशन नगर, नूतन वसाहत, प्रयाग नगर,सरकारी दवाखाना,कांचन नगर,अमरछाया टॉकीज जवळ,ख्रिश्चन कॉलनी या भागातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश असल्याचे सरकारी सुत्रांनी सांगितले आहे


Popular posts
भाजपाच्या प्रदेश कार्यसमितीवर बद्रीनाथ पठाडे यांची निवड
Image
कोवीड१९च्या पार्श्वभूमीवर जुना जालना विभागात  नगरसेवक आणि पोलिसांची मोटारसायकल रॅली
Image
चंदनझीरा येथे कोरोना स्वॕब टेस्ट शिबिराला सुरूवात. नगरसेविका मालनबाई दाभाडे यांनी स्वतः स्वॕब तपासणी करून नागरीकांचे मनोबल ऊंचावले.
Image
केंद्रीय राज्यमंत्री ना. रावसाहेब पा. दानवे यांनी दखल घेताच टाकळी कोलतेचे पीक विमा ऑनलाईन पोर्टलमध्ये नाव सामाविष्ट
Image
जालना शहरातील प्रभाग क्र.25 (ब) मध्ये आरोग्य सर्वेक्षण संपन्न 
Image