काळ्या बाजारात जाणारा स्वस्त धान्य दुकानाचा 18 क्विंटल तांदूळ बदनापूर पोलिसांनी पकडला स्वस्त धान्य दुकानदारात घाबराहतीचे वातावरण



जालना / विशेष प्रतिनिधी:- अभिषेक त्रिवेदी,



संपूर्ण देशात सध्या कोरोना संकटामुळे गोर गरिबांचे हाल होत असतांना देखील काही स्वस्त धान्य दुकानदार मात्र याचा पुरेपूर फायदा उचलत असून गोर गरिबांना धान्य वाटप न करता काळ्या बाजारात विक्री करीत आहे.जालना जिल्ह्यातील बदनापूर शहरातून एका छोट्या हत्ती वाहनात औरंगाबाद ला जात असलेला रेशन दुकानातील 18 क्विंटल तांदूळ पोलीस निरीक्षक एम बी खेडकर व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी वरुडी येथील चेक पोस्ट वर धरला मात्र पुरवठा विभागाने आपली जबाबदारी झटकल्याने पोलीस कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून 3 लाख 72 हजराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यामुळे स्वस्त धान्य चा काळाबाजार करणाऱ्या माफिया मध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.सध्या देशात कोरोना रोगाचा सामना करण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना राबवित असून एक हि व्यक्ती उपाशी राहणार नाही याची दक्षता घेतली जात असून स्वस्त धान्य दुकानातून गोर गरिबांना 2 रुपये किलो गहू व 3 रुपये किलो तांदूळ वाटपाचे आदेश शासनाने दिलेले आहे मात्र बदनापूर तालुक्यातील काही स्वस्त धान्य दुकानदार पुरवठा विभागाच्या आशीर्वादाने 50 ते 70 रुपये धडा धान्य विक्री करीत आहे त्यात देखील शासनाने कार्ड धारकास मान्य केलेले धान्य न देता कमी दिले जाते व उर्वरित धान्य काळ्या बाजारात विक्री केली जाते.बदनापूर शहरासह तालुक्यात काही स्वस्त धान्य दुकानदार मनमानी कारभार करीत असून गोर गरिबांना मंजूर असलेले धान्य शासन दरात न देता जास्त दराने विक्री करीत आहे व उर्वरित धान्य काळ्या बाजारात विक्री करतात असाच एक प्रकार बदनापूर पोलीस निरीक्षक एम बी खेडकर यांच्या तत्परतेने उजेळात आला. पोलीस निरीक्षक काही कर्मचाऱ्यासह वरुडी नूर हॉस्पिटल चेक पोस्ट कडे जात असताना बदनापूर येथून निघालेला छोटा हत्ती चार चाकी वाहतूक वाहन (क्रमांक एम एच 20 सी टी 9482) दिसले व त्या वाहनात शासकीय धान्याच्या गोण्या चमकल्याने संशय वाढला असता वाहन थांबवून हटकले मात्र त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने सदर वाहन मालासह ठाण्यात आणले. दरम्यान बदनापूर पोलिसांनी तालुका पुरवठा अधिकाऱ्यांना सदर बाब कळविली असता पुरवठा अधिकारी दिनेश राजपूत यांनी बदनापूर पोलीस ठाण्यात येऊन धान्य गोण्या बघितले आणि आपला माल नाही असे थातुरमातुर उत्तर देऊन निघून गेले असता पोलिसांनी रीतसर पत्र पाठवून दिले मात्र पुरवठा विभागाकडून समाधानकारक उत्तर पोलिसांना मिळाले नाही व शेवटी पोलीस प्रशासनाने  स्वतः जबाबदारी घेत पोलीस कर्मचारी मनोज निकम यांच्या तक्रारीवरून  रेशन दुकानाचे तांदूळ 18 क्विंटल एका वाहनातून काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी घेऊन जात होते म्हणून शेख सुभान,शेख इरफान रा कटकटगेट औरंगाबाद व सय्यद शाहिद रा बदनापूर या तिघांविरुद्ध कलम 188,269,34 व कलम 51 राष्ट्रीय आपत्ती अधिनियम 2005 , 3 व 7 जीवनावश्यक वस्तू अधिनियम अन्नवे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पूजा पाटील करीत आहे.
धान्य काळाबाजार माफिया मध्ये घबराट
बदनापूर शहरातील एका स्वस्त धान्य दुकानातून खरेदी केलेले 18 किवटल तांदूळ वाहनातून औरंगाबाद ला जात असताना पोलिसांनी धारल्याची माहिती वाऱ्या सारखी शहरात पासरल्यानंतर माफियांचे धाबे दणाणले व गुन्हा दाखल होऊ नये म्हणून पुरवठा विभागाला मॅनेज करण्यासाठी एका वाहन चालक मार्फत धावपळ सुरू झाली सदरील वाहन चालक हा तहसील कार्यालयात आर्थिक उलाढाल करण्यात माहिर असून त्या चालकाच्या माध्यमातून धान्य माफिया दिवसभर पुरवठा विभागाशी संपर्क साधून होता
धान्य शासकीय नसल्याचे पुरवठा विभागाने हात झटकले
पोलिसांनी बदनापूर हुन औरंगाबाद ला जाणारे स्वस्त धान्य दुकानातील तांदूळ धरल्याने पुरवठा विभागाची मोठी अडचण झाली व पुरवठा विभागाने हात झटकत सदर धान्य शासकीय आहे परंतु बदनापूर तालुक्यातील नाही असा जावई शोध स्वतःच लावून घेतला व पोलिसांनी आपल्यास्तरावर कारवाई करावी असे काळविल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे 
*यामध्ये मोठी साखळी असल्याचे समजते*
बदनापूर शहरासह तालुक्यातील काही स्वस्त धान्य दुकानदार गोर गरिबांना अन्न धान्य वाटप न करता काळ्या बाजारात विक्री करतात आणि  या कामासाठी बदनापूर शहरातील काही मंडळी सक्रिय असून सदर मंडळी स्वस्त धान्य दुकानदारांकडून धान्य खरेदी करून औरंगाबाद शहरात पाठवितात,पोलिसांनी योग्य दिशेने तपास केल्यास अनेक जण या मध्ये अडकण्याची शक्यता आहे.


Popular posts
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तात्पुरते निवृत्तिवेतन मिळणार सेवा पुस्तिका पडताळणीस विलंब होत असल्याकारणाने शासनाचा निर्णय
Image
चंदनझीरा येथे कोरोना स्वॕब टेस्ट शिबिराला सुरूवात. नगरसेविका मालनबाई दाभाडे यांनी स्वतः स्वॕब तपासणी करून नागरीकांचे मनोबल ऊंचावले.
Image
मंठा येथे झालेल्या खुन प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षेबरोबरच  पिडितेला न्याय मिळण्यासाठी बारकाईने चार्जशीट तयार करा या प्रकरणात दिरंगाई होणार नाही याची दक्षता घ्या पालकमंत्री राजेश टोपे यांचे पोलीस प्रशासनाला निर्देश प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यासाठी गृहमंत्र्यांशी चर्चा
Image
अत्याधुनिक कोरोना टेस्टिंग लॅबचं लवकरच लोकार्पण - राजेश टोपे आता अहवाल येण्यास विलंब होणार नाही
Image
सतत दुसऱ्या दिवशी सदर बाजार पोलीसांची धडाकेबाज कारवाई...
Image