जालना / प्रतिनिधी
जालन्यातील कोरोना संशयित रुग्णांच्या स्वॅबची तपासणी करून अहवालासाठी जालनेकरांना आता औरंगाबाद येथील प्रयोगशाळेवर अवलंबून राहावं लागणार नाही कारण जालन्यात देखील अत्याधुनिक कोरोना टेस्टिंग लॅब उभारली जाते. -जालन्यात कोरोनाचा धुमाकूळ काही कमी होत नाही.
जालन्यात आज कोरोनाबाधितांचा आकडा 914 वर पोचला असून आतापर्यंत 87 जणांचा बळी देखील गेला. जालन्यातील कोरोना संशयित रुग्णांचे स्वॅब पूर्वी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात येत होते. नंतर औरंगाबाद येथे कोरोना टेस्टिंग लॅब सुरू झाल्यामुळे जालन्यातील संशयितांचा स्वॅब तिकडे पाठविण्यात येताहेत. औरंगाबाद हुन टेस्टिंग होऊन येण्यात मोठा कालावधी लागत असल्याने कोरोना पोजिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची ट्रेसिंग करण्यास विलंब होत होता. त्यातच 2 दिवस औरंगाबाद येथील प्रयोगशाळेतील मशीन बंद पडल्याने सुमारे 200 स्वॅब पेंडिंग पडले होते. या समस्येवर तोडगा म्हणून आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेह टोपे यांच्या प्रयत्नाने जालना जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातच अत्याधुनिक कोरोना टेस्टिंग लॅब उभारण्यात येते. टोपे यांनी आज जालन्यात येऊन या प्रयोगशाळेच्या कामाची पाहणी करून सूचना दिल्या. कोरोना टेस्टिंगबद्दल जालना आता आत्मनिर्भर झालं असून याकोरोना टेस्टिंग लॅब आता शेवटच्या टप्प्यात असून लवकरच त्याचं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब नियोजन मंत्री राजेश टोपे यांनी आज जालन्यात दिली.
नागरिकांना कोरोनापासून बचावासाठी आरोग्यमंत्र्यानी दिला एसएमएस फॉर्म्युला
राज्यभरात सध्या कोरोनाचा धुमाकूळ सुरु च आहे.कोरोनाचा गुणधर्म संसर्गजन्य असून त्याचा प्रादुर्भाव वाढत असला तरी त्याचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनाला स्पष्ट सूचना देऊन ट्रेसिंग,टेस्टिंग आणि ट्रीटमेंट करण्याचा ट्रिपल टीचा सूत्र दिला. त्याचप्रकारे नागरिकांना देखील कोरोनापासून आपला बचाव करण्यासाठी एसएमएस चा फॉर्म्युला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी साय दै राजूरर्श्वर च्या माध्यमातून दिला.